विठ्ठल रामजी शिंदे
जन्म: 23 एप्रिल 1873, जामखिंडी, कर्नाटक
मृत्यू: 2 जानेवारी
1944
विठ्ठल रामजी शिंदे यांना
जनतेने "महर्षी" पदवी दिली, आणि अस्पृश्यता
निर्मूलन हे त्यांचे मुख्य कार्य होते, ज्याला त्यांनी
राष्ट्रीय एकात्मतेशी जोडले. 1932-33 मध्ये त्यांना बडोदा संस्थानचे सयाजीराव
गायकवाड परितोषिक मिळाले.
म्हणले गेलेले गौरव:
- गं. बा. सरदार यांनी
त्यांना "महाराष्ट्राचे अपेक्षित मानकरी" असे संबोधले.
- भाई माधवराव बागल यांनी
त्यांना "निष्काम कर्मयोगी" म्हटले.
संस्थात्मक योगदान:
- 1905: मुंबईत तरुण
आस्तिकांचा संघ स्थापन केला.
- 18 ऑक्टोबर 1906:
मुंबईत डिप्रेस्ड क्लास मिशनची स्थापना; पहिले अध्यक्ष -
न्यायमूर्ती चंदावकर.
- 1910: जेजूरी येथे
मुरळी प्रतिबंधक चळवळ.
- द्याराम गिड्डमल
यांच्या सहकार्याने ‘सेवा सदन’ ची स्थापना.
- पंढरपूर येथे रावजी
भोसले यांच्या सहकार्याने देवदासी प्रथा आणि व्यसनमुक्तीसाठी अनाथाश्रम.
- ब्राह्म समाजाच्या
प्रसारासाठी ‘ब्राह्म पोस्टल मिशन’ ची स्थापना.
- 23 मार्च 1918:
अस्पृश्यता निवारक संघाची स्थापना.
- मराठा समाजातील
जागृतीसाठी मराठा राष्ट्रीय संघाची स्थापना.
- 1920: पुण्यात
दुष्काळग्रस्तांसाठी दुष्काळ आपत्ती निवारण संस्था.
- 1937: स्त्रियांसाठी
‘अहिल्याश्रम’.
- 1923: तरुण ब्राह्म
समाज संघाची स्थापना.
- 1937: बहुजन पक्षाची
स्थापना.
- स्त्रियांसाठी
आर्यमहिला समाज, कौटुंबिक उपासना मंडळ.
- वृद्धांसाठी संगत सभा.
लेखन कार्य:
- सुबोध पत्रिका या
प्रार्थना समाजाच्या नियतकालिकात लेखन.
- 1903: प्रार्थना
समाजासाठी उपासना साप्ताहिकाची स्थापना.
- 1903: अॅम्स्टर्डॅम
येथील जागतिक धर्म परिषदेत "हिंदुस्थानातील उदारधर्म" हा निबंध सादर.
- Theistic Directory - जागतिक उदार धर्माची माहिती देणारा धार्मिक
ग्रंथ.
- Untouchable India, History
Of Partha, भारतीय अस्पृश्यतेचा
प्रश्न आणि माझ्या आठवणी व अनुभव हे आत्मचरित्र.
वैशिष्ट्ये:
- शिमगा सणातील अनुचित
प्रथांना थांबवण्यासाठी जनजागृती मोहिम.
- अस्पृश्यांसाठी ‘रूपी
फंड’ ची स्थापना.
- 1904: मुंबई धर्म
परिषद.
- 1905: अहमदनगर जवळ
भिंगार येथे अस्पृश्योद्धाराची शपथ.
- 1918: मुंबई येथे अखिल
भारतीय अस्पृश्यता निवारण परिषदेचे अध्यक्ष म्हणून कार्य; सायाजीराव गायकवाड हे प्रमुख.
- 1924: वायकोम
सत्याग्रहात सहभाग.
- 1935: बडोदा मराठी
साहित्य संमेलनात तत्वज्ञान आणि समाजशास्त्र शाखेचे अध्यक्ष.
- स्त्रियांच्या
प्रगतीसाठी भारतात महिला विद्यापीठे स्थापावी, अशी त्यांची
इच्छा.
- शाहू महाराजांनी मराठा
व्यक्तीला क्षात्र जगतगुरुपदी नेमल्याचा त्यांनी निषेध केला.

