विभाजतेच्या कसोट्या (Rules of Divisibility)
विभाजतेची व्याख्या:
विभाज्यता म्हणजे एखाद्या संख्येला दुसऱ्या संख्येने पूर्ण
भाग जातो का, हे निश्चित करणारे नियम.
विभाजतेच्या प्रमुख नियमांचे सारांश:
- 2 ची कसोटी (Divisibility by 2):
- संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, किंवा 8 असल्यास ती संख्या 2 ने भाग जाते.
उदा. 16, 34, 42, 66, 68, 1000
- 3 ची कसोटी (Divisibility by
3):
- संख्येतील सर्व अंकांची बेरीज 3 ने भाग जाण्यासारखी
असल्यास ती संख्या 3 ने भाग जाते.
उदा. 3672 → 3+6+7+2 = 18 (18 ÷ 3 = 6) म्हणून 3672 ही संख्या 3 ने भाग जाते.
- 4 ची कसोटी (Divisibility by
4):
- शेवटचे दोन अंक 4 ने भाग जात असल्यास ती संख्या 4 ने भाग जाते.
उदा. 254516 → शेवटचे दोन अंक = 16 (16 ÷ 4 = 4)
- 5 ची कसोटी (Divisibility by
5):
- संख्येच्या एकक स्थानी 0 किंवा 5 असल्यास ती संख्या 5 ने भाग जाते.
उदा. 435340, 53445, 63530
- 6 ची कसोटी (Divisibility by
6):
- संख्या 2 आणि 3 या दोन्ही संख्यांनी भाग जात असल्यास ती संख्या 6 ने भाग जाते.
- 7 ची कसोटी (Divisibility by
7):
- एकक स्थानाच्या अंकाची दुप्पट करून उर्वरित संख्येतून
वजा करा. तयार झालेल्या संख्येला 7 ने भाग जात असल्यास मूळ संख्या 7 ने भाग जाते.
उदा. 27720 → 2772 → 273 → 21 (21 ÷ 7 = 3)
- 9 ची कसोटी (Divisibility by
9):
- संख्येतील सर्व अंकांची बेरीज 9 ने भाग जात असल्यास
ती संख्या 9 ने भाग जाते.
उदा. 57260322 → 5+7+2+6+0+3+2+2 = 27 (27 ÷ 9 = 3)
- 10 ची कसोटी (Divisibility by
10):
- संख्येच्या एकक स्थानी 0 असल्यास ती संख्या 10 ने भाग जाते.
उदा. 100, 60, 5640, 57480, 354748, 3450
- 11 ची कसोटी (Divisibility by
11):
- संख्येतील सम आणि विषम क्रमांकावर असलेल्या अंकांची
बेरीज काढून त्यांचा फरक 0 किंवा 11 ने भाग जाण्यासारखा असल्यास ती संख्या 11 ने भाग जाते.
उदा. 956241 → (9+6+4) - (5+2+1) = 19 - 8 = 11
- 12 ची कसोटी (Divisibility by
12):
- संख्या 3 आणि 4 या दोन्हीने भाग जात असल्यास ती संख्या 12 ने भाग जाते.
- 15 ची कसोटी (Divisibility by
15):
- संख्या 5 आणि 3 या दोन्हीने भाग जात असल्यास ती संख्या 15 ने भाग जाते.
- 16 ची कसोटी (Divisibility by
16):
- शेवटचे चार अंक 16 ने भाग जात असल्यास ती संख्या 16 ने भाग जाते.
- 18 ची कसोटी (Divisibility by
18):
- संख्या 2 आणि 9 या दोन्हीने भाग जात असल्यास ती संख्या 18 ने भाग जाते.
स्पर्धा परीक्षेसाठी उपयोगी उदाहरणे:
- 2 ने नि:शेष भाग जाणारी संख्या कोणती?
उत्तर: 7824 (कारण एकक स्थानी 4 आहे.) - 3 ने नि:शेष भाग जाणारी संख्या कोणती?
उत्तर: 9123 → 9+1+2+3 = 15 (15 ÷ 3 = 5) - 5 ने नि:शेष भाग जाणारी संख्या कोणती?
उत्तर: 7485 (कारण एकक स्थानी 5 आहे.)
या नियमांवर आधारित अभ्यास करा आणि जास्तीत जास्त सराव
प्रश्न सोडवा. 😊

.png)