समाज सुधारक - आचार्य विनोबा भावे

0

 


आचार्य विनोबा भावे

 

जन्म: 11 सप्टेंबर 1895, गगोदा (रायगड) 

मृत्यू: 11 नोव्हेंबर 1982 

 

आचार्य विनोबा भावे हे महात्मा गांधींचे "मानसपुत्र" मानले जातात, आणि त्यांचे मूळ नाव विनायक नरहर भावे होते.

 

संस्थात्मक योगदान:

- 1921: वर्ध्याजवळ पवनार येथे आश्रमाची स्थापना; संम्ययोगी समाज निर्मितीची सुरुवात.

- 18 एप्रिल 1951: भूदान चळवळीची सुरुवात आंध्र प्रदेशातील पोचमपल्ली येथे केली.

- कांचनमुक्ती प्रयोगात पैशाला कमी आणि श्रमाला जास्त महत्त्व दिले.

 

लेखन कार्य:

- महाराष्ट्र धर्म मासिक, 1923.

- गीताई – भागवतगीतेचे समश्लोकी भाषांतर.

- मधुकर – निबंधसंग्रह.

- गीता प्रवचने – गीतेवरील प्रवचने.

- स्वराज्य शस्त्र – ग्रंथ.

- विचार पोथी – तत्त्वज्ञानावर आधारित लेखन.

- जीवनसृष्टी, अभंगव्रते, गीताई शब्दार्थ कोश.

- गीताई – धुळे येथील तुरुंगात सांगितली, आणि सोने गुरुजींनी लिहून घेतली.

 

वैशिष्ट्ये:

- वैयक्तिक सत्याग्रहासाठी पहिले सत्याग्रही म्हणून निवडले गेले.

- गीता आणि इसपनीती या ग्रंथांचा त्यांच्यावर विशेष प्रभाव.

- चंबळ खोऱ्यातील दरोडेखोरांचे हृदयपरिवर्तन घडवून आणले.

- उत्तर प्रदेशातील मंगरौठ येथे "सब भूमी गोपाल की" हा नारा दिला.

- जय जगत ही वैश्विक एकतेची घोषणा दिली.

Tags

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)