डॉ. भीमराव रामजी आंबेडकर
जन्म: 14 एप्रिल 1891, महू, मध्यप्रदेश
मृत्यू: 6 डिसेंबर 1956, मुंबई
डॉ. आंबेडकरांना भारतीय
संविधानाचे शिल्पकार आणि दलितांचा मुक्तिदाता म्हणून ओळखले जाते. 1990-91 मध्ये
मरणोत्तर भारतरत्न सन्मान मिळाला. त्यांची जन्मशताब्दी सामाजिक न्याय वर्ष म्हणून
साजरी करण्यात आली. हिंदू कोड बिल मांडल्यामुळे त्यांना "आधुनिक मनू"
म्हटले गेले. सामाजिक समता हा त्यांच्या विचारांचा केंद्रबिंदू होता. आंबेडकर हे
1947-51 मध्ये नेहरू मंत्रिमंडळात कायदेमंत्री होते.
संस्थात्मक योगदान:
- 1924: बहिष्कृत
हितकारिणी सभा स्थापन केली.
- 1924: नागपूर येथे
रिपब्लिकन पक्षाच्या स्थापनेची घोषणा.
- 20 मार्च 1927: महाड
येथील चवदार तळ्याचा सत्याग्रह.
- 25 डिसेंबर 1927:
मनुस्मृती दहन.
- 2 मार्च 1930: नाशिक
येथे काळाराम मंदिर सत्याग्रह (1935 मध्ये मंदिर खुलं झालं).
- 24 सप्टेंबर 1932: पुणे
करार - अस्पृश्यांसाठी कायदे मंडळात 148 जागा राखीव.
- 1933: मुखेड येथे
धार्मिक ग्रंथाचे पारायण.
- 1936: स्वतंत्र मजूर
पक्षाची स्थापना.
- 1937: बाळासाहेब खरे
सरकारात विरोधी पक्ष नेते.
- 1942: ऑल इंडिया
शेड्यूल्ड कास्ट्स फेडरेशनची स्थापना.
- मे 1946: पीपल्स
एज्युकेशन सोसायटीची स्थापना.
- 1946: सिद्धार्थ कॉलेज
ऑफ कॉमर्स, मुंबई आणि औरंगाबाद येथील
मिलिंद महाविद्यालयाची स्थापना.
लेखन कार्य:
- The Problem Of Rupee
- 1916: Cast In India
- 1930: जनता वृत्तपत्र; 1956 मध्ये याचे नाव प्रबुद्ध भारत केले.
- 1946: The Untouchables
- 1956: Thoughts on Pakistan
- 1957: बुद्ध आणि धम्म
(मृत्यूनंतर प्रकाशित)
- मुकनायक वृत्तपत्राची
सुरुवात संत तुकाराम यांच्या अभंगांनी आणि बहिष्कृत भारत संत ज्ञानेश्वरांच्या
अभंगांनी केली जात असे.
- Who Were Shudras? (1946)
वैशिष्ट्ये:
- त्यांचे आदर्श: गौतम
बुद्ध, महात्मा फुले, कबीर.
- 1920: माणगाव परिषदेचे
अध्यक्ष.
- 1930, 1931 आणि 1932 च्या गोलमेज परिषदांमध्ये
अस्पृश्यांचे प्रतिनिधित्व केले.
- 1935: येवला (नाशिक)
येथे धर्मांतराची घोषणा; "मी हिंदू म्हणून
जन्मलो, पण हिंदू म्हणून मरणार नाही" अशी
प्रतिज्ञा.
- शिका! संघटित व्हा!
संघर्ष करा! हा संदेश दिला.
- 29 ऑगस्ट 1947: संविधान
मसुदा समितीचे अध्यक्षपद भूषवले.
- 1948: हिंदू कोड बिल
संसदेत सादर केले.
- 14 ऑक्टोबर 1956:
नागपूर येथे बौद्ध धर्माची दीक्षा घेतली; चंद्रमणी
महास्थवीर यांनी दीक्षा दिली.


_Yashwant,_BR_Ambedkar,_Ramabai,_Laxmibai,_Mukundrao,_and_Tobby.jpg)