वि.दा. सावरकर
जन्म: 1883, भगूर (जि. नाशिक)
प्रभाव: इटालियन देशभक्त
जोसेफ मॅझिनी
विचारधारा: ब्रिटिशांच्या
विरोधासाठी शस्त्र संघर्ष आवश्यक मानला.
वि.दा. सावरकर यांनी 1900
मध्ये पुण्यात ‘मित्रमेळा’ या संघटनेची स्थापना केली, जी 1904 मध्ये ‘अभिनव भारत’ संघटनेत रूपांतरित
करण्यात आली. 1906 मध्ये शिवाजी स्कॉलरशिप मिळवून इंग्लंडमध्ये शिक्षणासाठी गेले.
त्यांच्या अनुपस्थितीत अभिनव भारताचे कार्य त्यांचे बंधू गणेश सावरकर यांनी
चालवले. सावरकरांनी अभिनव भारततर्फे पांडुरंग महादेव बापट (सेनापती बापट) यांना
पॅरिसमध्ये बॉम्ब बनवण्याचे प्रशिक्षण दिले.
घटनाक्रम:
- 1908: सावरकरांच्या
घरावर छापा टाकला गेला; गणेश सावरकरांवर
न्या. जॅक्सनने खटला दाखल केला, जो नाशिक खटला
म्हणून ओळखला जातो.
- 1909: अनंत कान्हेरे
यांनी न्या. जॅक्सनची हत्या केली.
- 1911: जॅक्सन हत्येतील
सहभागाच्या आरोपावरून सावरकरांना 50 वर्षांच्या काळ्या पाण्याची जन्मठेप देण्यात
आली.
- 1924: रत्नागिरी
जिल्ह्याची हद्द न सोडणे आणि राजकारणात सहभागी न होणे या अटींवर सावरकरांची
मुक्तता करण्यात आली.
लेखन कार्य:
सावरकरांनी भारतीय
इतिहासाची सहा सोनेरी पाने, हिंदू पदपादशाही, माझी जन्मठेप, हिंदुत्व, आणि 1857 चे भारतीय स्वातंत्र्य युद्ध अशा
ऐतिहासिक आणि विचारप्रवर्तक ग्रंथांचे लेखन केले.

