समाज सुधारक - भाऊराव पायगोंडा पाटील

0

 


भाऊराव पायगोंडा पाटील 

 

जन्म – 22 सप्टेंबर 1887, कुंभोज, जिल्हा कोल्हापूर 

मृत्यू – 9 मे 1959 

 

भाऊराव पाटील यांना महाराष्ट्रातील ‘बुकर टी. वॉशिंग्टन’ म्हणून ओळखले जाते. त्यांनी आपले संपूर्ण जीवन ग्रामीण शिक्षण प्रसारासाठी वाहिले, म्हणूनच त्यांना समाजसुधारणेतील एक दूरदर्शी नेते मानले जाते. त्यांना ‘कर्मवीर’ ही पदवी संत गाडगे महाराजांनी दिली होती, आणि त्यांच्या योगदानाच्या स्मरणार्थ 22 सप्टेंबर हा दिवस श्रमप्रतिष्ठादिन म्हणून साजरा केला जातो. 

 

रयतेचे बोधचिन्ह: वटवृक्ष 

 

 संस्थात्मक योगदान

- 1910: दूधगाव येथे विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी स्थानिक मदतीने प्रसारक मंडळाची स्थापना केली, जे 1924 साली साताऱ्यात मध्यवर्ती कार्यालय झाले. 

- 4 ऑक्टोबर 1919: कराड तालुक्यातील काले येथे रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली. 

- 1924: ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणसुविधा देण्यासाठी छत्रपती शाहू बोर्डिंगची स्थापना साताऱ्यात केली, ज्याचे उद्घाटन महात्मा गांधींच्या हस्ते झाले. 

- 1932: पुणे कराराच्या स्मरणार्थ मुलींसाठी ‘युनियन बोर्डिंग हाउस’ची स्थापना केली. 

- 1935: प्राथमिक शिक्षक प्रशिक्षणासाठी साताऱ्यात ‘सिल्व्हर ज्युबली ग्रामीण प्रशिक्षण महाविद्यालय’ उभारले. 

- 1940: महाराजा सायाजीराव हायस्कूल ही रयत शिक्षण संस्थेची पहिली माध्यमिक शाळा साताऱ्यात सुरू केली. 

- 1947: छत्रपती शिवाजी कॉलेज हे ग्रामीण महाराष्ट्रातील पहिले महाविद्यालय साताऱ्यात स्थापन केले. 

 

 अन्य महत्त्वपूर्ण योजना

भाऊराव पाटील यांनी ‘कमवा व शिका योजना’ सुरू केली, ज्यामुळे गरीब आणि होतकरू विद्यार्थ्यांना शिक्षणसहाय्य मिळाले. तसेच लक्ष्मीबाई पाटील मेमोरियल एज्यूकेशन फंडच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना बिनव्याजी कर्ज देण्याची योजना राबवली. 

 

 विशेष वैशिष्ट्ये

- समताधिष्ठित समाजनिर्मितीसाठी त्यांनी मोठे योगदान दिले. त्यांच्या वसतिगृहांतून विद्यार्थ्यांना उत्तम संस्कार दिले जात. 

- त्यांच्या कार्यावर महात्मा फुले, राजर्षी शाहू आणि महात्मा गांधी यांचा प्रभाव होता, आणि सत्यशोधक समाजाच्या विचारांचे ते अनुसरण करत. 

- शिक्षणात स्वावलंबन हा त्यांचा मुख्य गाभा होता; श्रमाच्या प्रतिष्ठेला महत्त्व देत त्यांनी शिक्षणाद्वारे बहुजन समाजाला सशक्त बनवले. 

- "एक वर्षाची तयारी करायची असेल, तर धान्य पेरा; शंभर वर्षांची तयारी करायची असेल, तर माणसे पेरा" हा त्यांचा संदेश होता. 

 

ह. रा. महाजनी यांनी भाऊराव पाटील यांना महाराष्ट्राचे बुकर टी. वॉशिंग्टन म्हटले, तर महात्मा गांधी म्हणाले की, "भाऊराव पाटील यांचे कार्य त्यांचे खरे स्मारक आहे." डॉ. पंजाबराव देशमुख यांनी त्यांच्या कार्याला सलाम करून म्हटले, “जगातील कोणत्याही विद्यापीठाच्या पदव्या कर्मवीर अण्णा भाऊराव पाटील यांच्या कार्याला गौरवण्यासाठी अपुऱ्या आहेत.”

Tags

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)