गोपाल गणेश आगरकर
जन्म: 14 जुलै 1856, करहाड तालुक्यातील टेंभू
मृत्यू: 17 जून 1895, पुणे
- 1 जानेवारी 1880: आगरकर यांनी चिपळूणकर आणि टिळक यांच्यासह 'न्यू इंग्लिश स्कूल'ची स्थापना केली.
- 1884: डेक्कन एजुकेशन सोसायटीची
स्थापना केली.
विचारसरणी:
बुद्धिप्रामाण्यवाद, वैज्ञानिक दृष्टिकोन, आणि सांसारिक जीवनाची प्रगती यावर भर दिला.
संस्थात्मक योगदान:
- 1881: लोकमान्य टिळकांनी सुरू
केलेल्या ‘केसरी’चे संपादक म्हणून योगदान.
- 15 ऑक्टोबर 1888: ‘सुधारक’ साप्ताहिकाची सुरुवात.
- पुस्तक: गुलामांचे
राष्ट्र — हिंदी समाजाच्या आळशी वृत्तीवर टीका.
- निबंध: स्त्रियांनी
शिकवलेच पाहिजे, यावर चर्चा.
- लेखन: अकोल्यातील
‘वर्हाघड समाचार’मधून लेखन.
- मराठी रूपांतर:
शेक्सपिअरच्या हॅम्लेटचे 'विकारविलासित' नावाने भाषांतर.
- डोंगरीच्या तुरुंगातील 101 दिवस हे पुस्तक.
- हिंदुस्थानाचे राज्य
कोणासाठी या निबंधात ब्रिटिशांच्या स्वार्थी वृत्तीवर टीका.
वैशिष्ट्ये:
- इष्ट तेच बोलण्याची
प्रवृत्ती.
- राजकीय
स्वातंत्र्यापेक्षा सामाजिक स्वातंत्र्याला अधिक महत्त्व दिले.
- हर्बर्ट स्पेन्सरच्या सोशॉलॉजी
आणि एथिक्स तसेच जॉन मिलच्या ऑन लिबर्टी आणि सब्जेक्शन ऑफ वूमन या ग्रंथांचा
प्रभाव.
- बुध्दिप्रामाण्यवाद आणि
व्यक्तीस्वातंत्र्याला प्राधान्य.
- ऐहिक जीवन समृद्ध
करण्याचा आग्रह; पारलौकिक जीवनाच्या
विचाराला निरर्थक मानले.
- समाजसुधारक म्हणून कार्य
करत असताना स्वतःचीच प्रेतयात्रा पाहावी लागणारे विरळे व्यक्तिमत्त्व.

