चालू घडामोडी. 27 नोव्हेंबर 2024

0



 27 नोव्हेंबर 2024 चालू घडामोडी. 


  1. टाइम्स हायर एज्युकेशन (THE) च्या "वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग, 2025" मध्ये ऑक्सफोर्ड विद्यापीठाने सलग _______ वर्षे पहिले स्थान मिळवले आहे.
    🏵 09वे वर्ष

  2. अलीकडेच संयुक्त राष्ट्रांच्या कोणत्या अंगाने मानवतेविरुद्धच्या गुन्ह्यांवरील ऐतिहासिक करारासाठी प्रस्ताव मंजूर केला आहे?
    🏵 महासभा

  3. 26 नोव्हेंबरपासून 13व्या संयुक्त राष्ट्र जागतिक भूस्थानिक माहिती व्यवस्थापनाची यजमानी कोणता देश करणार आहे?
    🏵 भारत

  4. 25 नोव्हेंबर रोजी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी 'टीचर अ‍ॅप' (Teacher App) चे उद्घाटन कोठे केले?
    🏵 नवी दिल्ली

  5. अलीकडेच केंद्र सरकारने प्रधानमंत्री जन-मन योजनेअंतर्गत कोणत्या राज्यात 76 रस्ते बांधण्यास मंजुरी दिली आहे?
    🏵 आंध्र प्रदेश

  6. केंद्र सरकारने नीती आयोगाच्या 'अटल इनोव्हेशन मिशन' ला किती कालावधीसाठी सुरू ठेवण्यास मंजुरी दिली आहे?
    🏵 31 मार्च 2028

  7. ऋतूनुसार वैद्यकीय सल्ला देण्यासाठी 'प्रकृती परीक्षा अभियान' अलीकडेच कोणाच्या द्वारे सुरू करण्यात आले आहे?
    🏵 आयुष मंत्रालय

  8. अलीकडे प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार, AI संशोधन प्रकाशनांमध्ये भारताने कोणते स्थान मिळवले आहे?
    🏵 तिसरे

  9. दिल्ली सरकारने 70 वर्षांवरील वृद्धांना दरमहा किती वृद्धापकाळ पेन्शन देण्याची घोषणा केली आहे?
    🏵 2500 रुपये

  10. 'राष्ट्रीय दूध दिन' दरवर्षी कोणत्या तारखेला साजरा केला जातो?
    🏵 26 नोव्हेंबर

  11. अलीकडेच _______ यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने "एक राष्ट्र, एक सदस्यत्व" योजना मंजूर केली आहे.
    🏵 पंतप्रधान नरेंद्र मोदी

  12. नौवहन मंत्रालयाच्या मते, भारताचा किती टक्के व्यापार सागरी वाहतुकीद्वारे हाताळला जातो?
    🏵 95%

  13. अलीकडे केंद्र सरकारने किती कोटी रुपयांच्या नवीन राष्ट्रीय नैसर्गिक शेती मिशनची घोषणा केली आहे?
    🏵 2,481 कोटी रुपये

  14. अलीकडेच इस्रोने 'गगनयान' मिशनसाठी कोणत्या देशाच्या अंतराळ संस्थेबरोबर करार केला आहे?
    🏵 ऑस्ट्रेलिया

  15. अलीकडे कोणत्या राज्य सरकारने कचरा संकलन कर वसुली बंद करण्याचा निर्णय घेतला आहे?
    🏵 आंध्र प्रदेश


आजचा सुविचार:
"जर तुमचे ध्येय तुमच्यासाठी महत्त्वाचे असेल, तर ते साध्य करण्यासाठी कोणतीही अडचण मोठी नसते."

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)