1857 च्या पूर्वीचे उठाव (Rebellions Before 1857)
आप्पासाहेब भोसल्यांचा उठाव (1817 – 18)
• गौड जमातीच्या प्रमुखांच्या मदतीने
आप्पासाहेब भोसल्यांनी उठाव केला.
• बेतूर येथे इंग्रजी फौजेचा पराभव
केला.
• शीख राजा रनजीसिंहला लढण्यासाठी
प्रेरित करण्याचा प्रयत्न केला.
• शेवटी इंग्रजांकडून पराभूत झाले.
हटकरांचा उठाव – मराठवाड्यात
• नांदेड, परभणी
आणि पैनगंगेच्या प्रदेशात 1800 – 1820 या
कालावधीत हा उठाव झाला.
• नेता – नौसोजी नाईक
• प्रमुख ठाणे – नोव्हा
• ब्रिटीशांनी हा उठाव मोडून टाकला.
खानदेशातील भिल्लांचा उठाव
• खानदेशात भिल्लांनी लूटमार केली.
यामागे यशवंतराव होळकरांची शहाणगी होती.
• प्रमुख नेते – काजरसिंग, भीमा नाईक, भागोजि नाईक, नेवश्य नाईक, कलुबाबा, दौलत नाईक, तंट्या
भिल्ल
• भिल्लांना वठणीवर आणण्यासाठी लॉर्ड
एलफिन्स्टनने अनेक प्रयत्न केले.
खानदेशातील भिल्लांचा उठावाचे उपाय
• 1825 मध्ये
भिल्लांसाठी जमिनी देणे आणि वसाहती निर्माण करणे.
• भिल्लांना पोलिस दलात नोकर्या
दिल्या.
• बंडखोर भिल्लांना वठणीवर आणण्यासाठी
इतर भिल्लांचा वापर केला.
काजरसिंग नाईकचा उठाव
• 1875 मध्ये
खानदेशातील ब्रिटीशांविरुद्ध भिल्लांच्या उठावाचे नेतृत्व काजरसिंग नाईक यांनी
केले.
• काजरसिंग नाईक पूर्वी ब्रिटीशांच्या
पोलिस दलात होता.
• त्याने ब्रिटीशांचा 7 लाख रुपयांचा खजिना लुटला.
• 1858 च्या 'अंबापाणी' लढाईत भिल्लांनी ब्रिटीशांशी संघर्ष केला, ज्यामध्ये स्त्रियांचाही सक्रिय सहभाग होता.
1857 चा राष्ट्रीय उठाव व त्याची कारणे
• 1757 ते 1856 या कालावधीत भारतातील इंग्रजी सत्तेचा विस्तार सुरू झाला.
• 1856 पर्यंत जवळपास
संपूर्ण भारतावर इंग्रजांची सत्ता प्रस्थापित झाली होती.
• 1857 मध्ये भारतात
इंग्रजांविरुद्ध एक मोठा सशस्त्र उठाव झाला, ज्याला
'राष्ट्रीय उठाव' म्हणून ओळखले जाते.
• 1857 मध्ये झालेल्या
बंडाला भारताचे पहिले स्वातंत्र्ययुद्ध मानले जाते.
• लाखो सैनिक, कारागीर, शेतकरी एकत्र आले आणि परकीय सत्ता उलथून टाकण्याचा प्रयत्न केला.
परंतु हा उठाव अचानक घडलेला नव्हता.
• ब्रिटिशांची नीती आणि साम्राज्यवादी
शोषण याविरुद्ध असंतोष ही या उठावाची मुख्य कारणे होती. हा असंतोष शंभर
वर्षांपेक्षा अधिक काळ सुरू होता.
• ब्रिटिशांनी भारतावर विजय मिळवून
भारताची अर्थव्यवस्था आणि समाज वसाहतीकरण केले.
• या प्रक्रियेचा परिणाम म्हणून अनेक
राजे, जमीनदार, पाळेगार
आणि पराजित भारतीय संस्थानांचे पदाधिकारी अनेक वेळा अंतर्गत उठाव करत होते.
• शेती व्यवस्था नष्ट होऊन शेतकऱ्यांना
अडचणी येत होत्या. तसेच परंपरागत उद्योग नष्ट होऊन कारागीरांचा रोजगार गेला होता.
लष्करातून सेवानिवृत्त सैनिकही यामध्ये सामील झाले होते.
• 1760-70 च्या दरम्यान
बंगालमधील संन्याशी बंड, बिहारमधील चुआर
उठाव यांसारख्या उठावांनी या संघर्षांना सुरुवात केली. नंतर जवळजवळ प्रत्येक वर्षी
ब्रिटिश सत्तेशी संघर्ष होतच राहिला.
• देशाच्या कोणत्याही भागात लष्करी बंड
झाले नाही असे एकही दशक गेले नाही.
• 1773 ते 1786 च्या दरम्यान किमान 40
मोठ्या लष्करी संघर्षांचा इतिहास आहे.
• 1857 च्या
स्वातंत्र्ययुद्धामध्ये देशभरातील लाखो लोकांचा सहभाग होता. यामुळे ब्रिटिश
सत्तेला मुळापासून एक मोठा धक्का बसला.
निष्कर्ष:
1857 चा राष्ट्रीय उठाव हा भारतातील
स्वातंत्र्य संग्रामाच्या सुरुवातीचा टप्पा होता. यापूर्वी अनेक छोटे मोठे उठाव, बंड आणि संघर्ष झाले होते, परंतु
1857 च्या उठावाने इंग्रजी साम्राज्याला
कडवट धक्का दिला. यामध्ये शेतकरी, सैनिक, कारागीर आणि पारंपरिक व्यवसाय करणारे लोक एकत्र आले आणि परकीय
सत्तेविरुद्ध लढण्यासाठी एकत्र झाले.

.jpg)
