PYQ (Previous Year Question) Analysis कसे करावे आणि त्याचा फायदा कसा होतो?

0

 


PYQ (Previous Year Question) Analysis कसे करावे आणि त्याचा फायदा कसा होतो?

1️⃣➡. लक्ष्य स्पष्ट ठेवा:

  • काही जणांना वाटते की PYQ सोडवणे म्हणजे अभ्यासक्रम मागे पडतोय, पण हे पूर्णतः चुकीचे आहे.
  • आपले अंतिम उद्दिष्ट परीक्षेत उत्तीर्ण होणे आहे, केवळ अभ्यासक्रम पूर्ण करणे नाही. त्यामुळे PYQ सोडवणे हे अभ्यासाचा अविभाज्य भाग समजा.

2️⃣➡. वाचन सुधारण्यासाठी महत्त्वाचे:

  • PYQ सोडवल्यानंतर वाचनाची गुणवत्ता वाढते.
  • प्रश्न पाहून अभ्यास करताना आपण नेमके कोणते मुद्दे महत्त्वाचे आहेत हे ओळखू शकतो. त्यामुळे आपला अभ्यास अधिक प्रभावी होतो.
  • आपण जे underline करतो, ते PYQ च्या संदर्भाने अधिक लक्षात राहते.

3️⃣➡. वेगळ्या दृष्टिकोनातून अभ्यास:

  • PYQ पाहून आपल्याला प्रत्येक वेळा नवीन दृष्टिकोन मिळतो.
  • रिव्हिजन करताना मार्क्स वाढत असल्याचा आत्मविश्वास निर्माण होतो, ज्यामुळे अभ्यास ट्रॅकवर राहतो.

4️⃣➡. सखोल अभ्यास:

  • पुस्तक वाचणे हा फक्त ५०% अभ्यास असतो. उरलेले ५०% म्हणजे त्या घटकावर आधारित प्रश्न विचारला गेला तर तो कसा सोडवायचा याचा सराव.
    उदा. कलम ७५(३): मंत्रिमंडळ संसदेला जबाबदार आहे, असा प्रश्न परीक्षेत विचारला तर बरोबर वाटतो, पण तो चुकीचा आहे.
    खरे उत्तर: मंत्रिमंडळ लोकसभेला जबाबदार आहे.
  • अशा विरोधाभासांचा अभ्यास करणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे.

5️⃣➡. प्रश्नांची पुनरावृत्ती:

  • प्रत्येक परीक्षेत १०-१५% प्रश्न पूर्वी विचारलेले असतात. ते प्रश्न चुकू नयेत यासाठी PYQ मदत करतात.
  • जुने प्रश्न सोडवल्यास ते सहज लक्षात राहतात.

6️⃣➡. PYQ द्वारे रिव्हिजन:

  • PYQ हा रिव्हिजन करण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे.
  • जुन्या विषयांचा विसर पडू नये यासाठी दररोज काही PYQ सोडवा, जेणेकरून सतत पुनरावलोकन होईल.

7️⃣➡. आयोगाचा अभ्यासक्रम आणि पॅटर्न समजून घेणे:

  • आयोगाच्या प्रश्नांमागील तर्क आणि लॉजिक समजून घ्या.
  • ज्ञान + लॉजिक = यश.
  • जास्तीत जास्त ९२-९५ प्रश्न attempt करण्याचे लक्ष्य ठेवा, कारण सर्व प्रश्न पुस्तकातून येत नाहीत. तर्कशक्तीचा वापर करावा लागतो, जो PYQ अभ्यासाने विकसित होतो.

8️⃣➡. पर्यायांचा अभ्यास:

  • आयोगाचे पर्याय देण्याची पद्धत समजते. उदा.
    • मोठा पर्याय, विशिष्ट पर्याय, ब्रॅकेटमधील माहिती असलेले पर्याय बहुतेक बरोबर असतात.
    • Extreme statements (Only, All) सहसा चुकीचे असण्याची शक्यता जास्त.
  • Elimination method चांगले उत्तर निवडण्यासाठी मदत करते.

9️⃣➡. अनोळखी प्रश्न सोडवण्याचा आत्मविश्वास:

  • PYQ चा अभ्यास केल्यामुळे अनोळखी प्रश्न सोडवण्याचा आत्मविश्वास वाढतो.
  • प्रश्न सोडवताना तर्कशक्ती आणि लॉजिक विकसित होते, जे परीक्षेत प्रत्यक्षात उपयोगी पडते.

🔟➡. Active Study साठी महत्त्वाचे:

  • सलग ४-५ तास वाचन केल्याने डोकं जड होऊ शकतं किंवा झोप येऊ शकते.
  • यासाठी २-३ तास वाचनानंतर १-२ तास PYQ सराव करा.
  • हे अभ्यासाला सक्रिय ठेवते, कंटाळा दूर ठेवते आणि सुसंगत अभ्यास होतो.

PYQ Analysis कसा फायदेशीर ठरतो?

  • सखोल अभ्यास: प्रश्नांमधून अचूक वाचनाचा अंदाज येतो.
  • विषयांवर पकड: कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत, त्या नेमक्या समजतात.
  • पॅटर्नची ओळख: आयोगाच्या प्रश्नांची रचना आणि पर्याय ओळखता येतात.
  • आत्मविश्वास: प्रत्यक्ष परीक्षेतील अनोळखी प्रश्नांवरही आत्मविश्वासाने तोंड देता येते.
  • समर्पक रिव्हिजन: सतत अभ्यासक्रमाचे पुनरावलोकन होत राहते.

👉 सारांश: PYQ सोडवणे हा अभ्यासाचा अविभाज्य भाग आहे. तो केवळ प्रश्न सोडवण्यापुरता मर्यादित नाही तर परीक्षेसाठी मानसिक तयारी, तर्कशक्ती आणि रिव्हिजनसाठी अत्यंत प्रभावी आहे.

Tags

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)