द अर्ल ऑफ ऑकलंड (१७८४–१८४९)
कार्यकाल - १८३६ - १८४९
म्हणजेच जॉर्ज ईडन हे ब्रिटिश ईस्ट
इंडिया कंपनीचे गव्हर्नर-जनरल होते. त्यांचा कार्यकाळ (१८३६-१८४२) अनेक ऐतिहासिक
घटनांनी महत्त्वपूर्ण ठरला. त्यांनी काही महत्त्वाचे निर्णय घेतले आणि त्यांची
कारकीर्द मुख्यत्वे परराष्ट्र धोरण आणि लष्करी संकटांशी संबंधित होती. त्यांच्या
कार्यकाळातील काही महत्त्वाच्या घटना पुढीलप्रमाणे आहेत:
1. त्रिपक्षीय करार (१८३८):
ब्रिटिश, शाह शुजा आणि महाराजा रणजित सिंह यांच्यात अफगाणिस्तानात सत्ता
संतुलन राखण्यासाठी त्रिपक्षीय करार झाला.
2. पहिले अँग्लो-अफगाण युद्ध (१८४०-१८४२):
हे युद्ध ऑकलंडच्या धोरणांमुळे झाले. १८४२ मध्ये अफगाणिस्तानातून
माघार घेत असताना ब्रिटिश सैन्याने मोठी आपत्ती अनुभवली, ज्यात अफगाण
सैन्याने त्यांच्यावर हल्ला केला आणि बहुतेक ब्रिटिश सैनिकांना मारले. हा ब्रिटिश
लष्करासाठी सर्वात वाईट पराभव म्हणून ओळखला जातो.
3. बँक ऑफ बॉम्बे (१८४०):
ऑकलंडच्या काळात बँक ऑफ बॉम्बेची स्थापना झाली, ज्याने
नंतर इम्पीरियल बँक ऑफ इंडिया आणि सध्याच्या स्टेट बँक ऑफ इंडियाचा पाया घातला.
4. पहिले बंगाली दैनिक 'संवाद प्रभाकर' (१८३९):
ऑकलंडच्या काळात हे दैनिक बंगालमध्ये प्रकाशित झाले.
5. तत्वबोधिनी सभा (१८३९):
देवेंद्रनाथ टागोर यांनी तत्वबोधिनी सभेची स्थापना केली, जी
बंगाली सुधारणा चळवळीचा एक भाग होती.
ऑकलंडच्या धोरणांचा परिणाम लष्करी आणि आर्थिक क्षेत्रात तसेच बंगाली
समाजात झालेल्या सुधारणा यावर विशेष झाला.

